मन आणि बुद्धी मधे कायमच द्वंद्व चालत असत. तौलनिक विचार करून बुद्धी कौल देत असते. मन मात्र थेट निर्णय सांगते. मनात कुठून आलं कस आलं माहित नाही पण Mt. Yunam expedition करायचं ठरवलं. या आधी '' ट्रिनिटी '' सहा हजार मीटर च्या वर कोणती मोहीम झाली नव्हति. कसलेले तयारीचेच ट्रेकर Yunam साठी सिलेक्ट करणं गरजेचं होत. मोहीम delcear करण्या आधीच डॉ. नागनाथ तयार होता. मी चांद्रखाणी पास च्या ट्रेक वर असताना शेखर नि कॉल करून त्याची सीट आरक्षित केली. अमित नि पण कॉल करून त्याच्या सगळ्या शंकांचं समाधान झाल्या वर टीम मध्ये एन्ट्री केली तर विजय ११th hour ला इन झाला. आमचा आता ५ जणांचा छोटा संघ तयार झाला. Valley Of Flowers ट्रेक वरून आल्या वर युनाम ची तयारी करायला जेमतेम १ आठवडाच हातात होता.
१७ तारखेला पुण्यातून निघून पहाटे चंदीगढ ला पोचलो. एअरपोर्ट लाच आमच्या बरोबर अजून २ टीम आमच्या बरोबर युनाम साठी होत्या. सगळे आता आमची २१ जणांची टीम झाली.
दुपारी जेवणाच्या वेळेत नग्गर ला पोचलो. जेवण करून थोडं फ्रेश होऊन सगळे नग्गर चा राजवाडा आणि मंदिर पाहायला निघालो. आजचा दिवस आंणि रात्र आरामदायक होती. उद्या पासून ह्या कंफर्ट झोन मधून ८ दिवसांसाठी बाहेर पडणार होतो. अर्थात ह्याच साठी आमच्या हिमालयात वाऱ्या चालू असतात. ट्रेकर्स चा आनंद कष्टात सामावला आहे. म्हणजे ''जेवढे कष्ट जास्त तेवढा आनंद जास्त''
क्रमशः
|| श्रीकृष्णार्पणमस्तु |
Write a comment ...