नग्गर च्या बेसकँप ला नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. रूम च्या बाहेर आलो तस उंच डोंगर, गर्द झाडी, फ्लॉवर च्या आकाराचे ढग आणि सफरचंदांनी लगडलेल्या झाडांनी शुभप्रभात केल. ट्विन पासेस च्या वेळचा मे मधला बेसकॅम्प आणि आत्ताचा बसेकँप ह्यात जमीन आसमान चा फरक होता. मे मधल्या गर्दीत हरवलेला बेसकँप आज शांततेत हरवला होता. नेहमीच्या ट्रेक सारखी काहीच घाई नव्हती. सगळा निवांत कारभार होता. कारण आजचा दिवस पिटुकला होता.
Expedition च्या सामानाची बांधाबांधी करून 930 वाजता बेस कँप सोडला. वाटेत मनालीला 11th hour ची खरेदी करून मनाली सोडलं. 9 km लांबीच्या अटल टनेल नी आम्हाला सिसू ला पोचवल. अटल टनेल खरोखरच एक engineering marval आहे. 9 km च्या टनेल नी एका वेगळ्याच विश्वात नेल. Terrain बदल्ल्याच जाणवत होत. 230 च्या आसपास Kelong ला आलो. आजची वसती Kelong ला.
उदरभरण करून 4 वाजता सगळे acclimatization walk साठी सिसु monestary ला निघलो. छोटे छोटे ओहोळ एक होऊन एक मोठ्ठा झरा होतो तसा आता आमचा 21 जणांचा एक मोठ्ठा ग्रुप झाला. १०,१०० फुटांवरची छातीवर असलेली चढाई. लहान मुलं आईचा पदर धरून चालतो तसे श्वास पायांची लय पकडुन चालले होते. मधेच आईचा पदर हातातून सुटून मुल कावरबावर होत तसच श्वास आणि पायांची लय तुटली की श्र्वासाच व्हायचं.
वेळेत सगळे सीसु monestary ला आले. Monestoey मधल टिपिकल गूढ आणि शांत वातावरण. आपोआप सगळे शांत पणे ध्यानाला बसले. पावसाची रिमझिम सुरू झाली तसा आम्ही काढता पाय घेतला. खुप उंचीवर आल्यामुळे सगळा परिसर समोर पट मांडल्या सारखा दिसत होता. स्तिमित करणारे उंच डोंगर, त्यांच्या अंगाखांद्यावर असलेल्या वाड्या वस्त्या, डोंगराच्या कुशीतून वाहणारी भागा नदी आणि तिचा कान तृप करणारा आवाज, शरीराला झट्या देणार थंडगार वारा. कैक दिवसांच्या विरहानंतर उंच आकाशामधून डोंररांशी गप्पा मारायला आलेले ढग. रंभा, उर्वशी असणारा स्वर्गसुद्धा यापुढे फिका असेल. घरी आल्यावर मस्त चवदार, गरमागरम जेवण करून निद्राधीन झालो.
क्रमशः
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
Write a comment ...