पुन:श्च हरिश्चंद्रगड
परंपरा. म्हणजे आजच्या बोलीभाषेत rituals!! तर या rituals ला फार महत्त्व आहे. दिवाळीत उटण्याएवढाच मोती साबणाला मान, मोती साबण अंगाला लागल्या शिवाय दिवाळी साजरी होऊच शकत नाही. अगदी तसंच अमेरिकेवरून अभिषेक सुट्टीसाठी आला की आमची हरिश्चंद्रगडावर वारी झालीच पाहिजे, ही आमची एक परंपरा. त्याशिवाय त्याची भारत यात्रा सुफळ होत नाही